सौंदर्याची चमक वाढविण्यासाठी हे घरगुती उपाय करून तर पाहा, फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर...


 लाइफस्टाईल: आजकाल, तरुण स्त्रिया उत्कृष्ट आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्वचेची काळजी घेतात. त्याचप्रमाणे महागड्या सौंदर्य निगा उत्पादनांचा वापर करतात. जेणे करून सौंदर्याची चमक अधिक वाढावी, आणि चमकदार त्वचा दिसावी. त्याचप्रमाणे काही घरगुती उपचारांनी देखील तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. घरगुती रेमेडी वापरून फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला असाधारण काहीही खर्च करण्याची गरज नाही. घरगुती पद्धतीने उपचार करून तजेदार चेहरा मिळवणे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 


तसेच डोळ्यांची सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी देखील तुम्ही घरगुती उत्पादनांचा वापर करू शकता. यासाठी, एक चमचा कोरफडीच्या आतील गर एका वाटीमध्ये  काढून घ्यावा त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि दोन थेंब सुगंधी तेल घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्या. मिक्सर मध्ये फिरवून घेतल्या नंतर एका मोकळ्या डबी मध्ये काढून घ्या व रोज दिवसातून 2 वेळा डोळ्यांच्या भोवती लावा आणि सुमारे 10 मिनिटा नंतर फेसवॉश किंवा थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्यावा.

तर फेस पॅक त्वचेच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करतो. त्यासाठी 2 चमचे दही, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा मुलतानी माती आवश्यक आहे. त्वचेसाठी घरगुती पध्दतीने फेसपॅक तयार करण्यासाठी प्रत्येक सांगितलेले साहित्य असणे गरजेचे आहे . दही,बेसन,मुतानी माथी एकत्र करून त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी घालून मिक्स करून घेणे.पॅक चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा नंतर चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे पॅक लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.

तुम्ही हे रोज सात दिवस वापरू पाहा आपल्याला चेहऱ्यावर फरक जाणवेल. दहीमध्ये बॅक्टेरिया आणि शमन करणारे गुणधर्म असतात. बेसनमधील झिंक स्वच्छतेच्या दूषिततेशी लढण्यास मदत करते. मुलतानी माती जास्त प्रमाणात तेल आत्मसात करते आणि छिद्र उघडण्यास मदत करते. 


प्रसन्न त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या आणि अमृत फेस पॅक लावू शकता. यामुळे तुमची त्वचा तशीच नाजूक आणि गुलाबी होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे फ्लॉवर पाकळी पावडर आणि चार चमचे गुलाब जल लागेल. 


(टीप: कोणत्याही उपचारापूर्वी तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा.)


Read more :

Related Posts